महाराष्ट्र
महाराष्ट्रातील समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा असलेले कोल्हापूर शहर पर्यटकांसाठी विविध आकर्षणे देते. प्राचीन मंदिरांपासून ते निसर्गरम्य तलावांपर्यंत, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. येथे कोल्हापूरमधील टॉप १० सर्वोत्तम पर्यटन स्थळांची सविस्तर मार्गदर्शक आहे, जी तुमचे प्रवास नियोजन सोपे करण्यासाठी आम्ही तुम्हाला १० पर्यटन स्थळे सांगत आहोत.
महालक्ष्मी मंदिर ला अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखले जाते. हे देवी महालक्ष्मीला समर्पित एक महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे, देवी महालक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे. हिंदूंमध्ये तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर आणि पद्मावती मंदिर ह्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या मंदिरांना तीर्थक्षेत्र म्हणून भेट दिल्यास मोक्ष प्राप्त करण्यास मदत होते. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून ४ किलो मीटर च्या अंतरावर आहे. कर्णदेवाने ६३४ CE मध्ये महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य राजवटीत बांधले होते. दगडी चबुतऱ्यावर आरोहित, मुकुट घातलेली देवीची मूर्ती रत्नांनी बनलेली आहे. ह्या मूर्ती चे वजन सुमारे 40 किलोग्रॅम आहे. काळ्या दगडात कोरलेली महालक्ष्मीची प्रतिमा 3 फूट उंचीची आहे. मंदिरातील एका भिंतीवर श्री यंत्र कोरलेले आहे. तुम्ही ह्या मंदिराला आवश्य भेट द्या.
न्यू पॅलेस हा एक राजवाडा आहे. ह्या पॅलेस ला बनवण्यास ७ वर्षे लागली आणि सुमारे सात लाख रुपये खर्च आला. न्यू पॅलेस कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून ५ किलो मीटर च्या अंतरावर आहे. काळ्या पॉलिश दगडात बांधलेल्या भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असल्याने पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरले आहे. येथे बाग, कारंजे आणि कुस्ती मैदानासह मोटा परिसर आहे. संपूर्ण इमारत आठ कोनांची असून मध्यभागी एक मनोरा आहे. त्यावरचे घड्याळ १८७७ मध्ये निश्चित करण्यात आले होते. येथे प्रत्येक काचेवर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग कोरलेले आहेत. येथे एक प्राणीसंग्रहालय आणि ग्राउंड लेक आहे. अजून खूप महत्वाची बाब म्हणजे आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती शाहू महाराजांचे हे निवासस्थान आहे.
पन्हाळा किल्ला का कोल्हापूर पासून २३ किलोमीटर च्या अंतरावर आहे. आकाराने झिगझॅग असल्यामुळे ह्या किल्ल्याला 'सापांचा किल्ला' असेही म्हणतात. शिलाहार चा राजा भोज २ याने ११७८ आणि १२०९ मध्ये हा किल्ला बांधला होता. येथे कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई राणीसाहेबांनी आपली सुरुवातीची वर्षे घालवली. किल्ल्याचे अनेक भाग आणि त्यातील वास्तू अजूनही शाबूत आहेत. सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले पन्हाळा हे निसर्गसौंदर्य, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक किल्ले असलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. विशेषत: पावसाळ्यात हिरव्यागार टेकड्या, जंगले आणि धबधबे सर्वोत्तम असतात.
हे मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या एकदम जवळ आहे. श्री तुळजा भवानी मंदिर हे महालक्ष्मी मंदिरापेक्षा आकाराने लहान असला तरी भाविकांसाठी धार्मिक महत्त्व आहे. भवानी मंडपाच्या मध्यभागी तुळजा भवानीचे मंदिर आहे, जी महालक्ष्मीची धाकटी बहीण मानली जाते आणि तिला कोल्हापुरात पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. श्री छत्रपतींनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी हे मंदिर बांधले. अनेकांचा असा विश्वास आहे की येथील मूर्ती शिवाजी महाराजांनी पुजलेली आहे.
रंकाळा लेक कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून ५ किलो मीटर च्या अंतरावर आहे. हे ठिकाण कोल्हापूर करासाठी लोकप्रिय संध्याकाळचे ठिकाण आणि मनोरंजन केंद्र आहे. हा तलाव दिवंगत महाराजा श्री शाहू छत्रपती यांनी बांधला होता. तलाव चौपाटी आणि इतर उद्यानांनी वेढलेला आहे. ह्या लेक च्या शेजारी शालिनी पॅलेस उभा आहे. चौपाटी, चटक दार भेळ-पुरी , रगडा-पॅटीज आणि विविध खाद्यपदार्थांचे स्नॅक्स येथे भेटतात पूर्वी कोल्हापूर हे चित्रपटसृष्टीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण रंकाळा तलावाच्या आवती भवती झाले आहे.
शालिनी पॅलेस हे कोल्हापूर बस स्टँडवरून ५ किलो मीटर च्या अंतरावर आहे. हे पॅलेस १९३१ ते १९३४ मध्ये ८00,000 रुपये मध्ये बांधण्यात आले. ह्या पॅलेस चे नाव कोल्हापूरच्या राजकुमारी शालिनी राजे यांच्या नावावर ठेवण्यात आले. हा पॅलेस रंकाळा लेक च्या शेजारी आहे. १९८७ मध्ये ह्या पॅलेसचे 3-स्टार हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आणि अनेक चित्रपटांसाठी पार्श्वभूमी म्हणून त्याचा वापर केला गेला. मोठ्या नुकसानीमुळे ते २०१४ मध्ये बंद करून पालिकेला द्यावे लागले. पॅलेस गुंतागुंतीच्या काळ्या दगड आणि इटालियन संगमरवरींनी बांधला आहे. ह्या पॅलेसला तुम्ही नक्की भेट देऊ शकता.
टाउन हॉल संग्रहालय हे कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून ३ किलो मीटर च्या अंतरावर आहे. हि वस्ती १८७२ ते १८७६ च्या दरम्यान बांधण्यात आली. टाउन हॉल संग्रहालयाच्या आजू बाजूला खूप सारी झाडी आहेत. ब्रम्हपुरी उत्खनात सापडलेल्या पुरातन मूर्ती, गाजलेल्या चित्रकारांची भव्य भिंती चित्रे, प्राचीन नाणी, तलवारी, बंदुका, भाले इत्यादी गोष्टी तुम्ही इथे बघू शकतात.
भवानी मंडप हे कोल्हापूर शहराच्या मध्यभागी वसलेली एक ऐतिहासिक वास्तू आहे. हे ठिकाण महालक्ष्मी मंदिराजवळ आहे. हा कोल्हापूरच्या महाराजांचा राजेशाही थाट आहे. हा छत्रपती महाराजांचा दरबार असायचा. भवानी मंडप हे पूर्वीच्या काळातील महत्त्वाचे संमेलनस्थळ होते. त्यात विविध न्यायालयीन अधिकाऱ्यांची कार्यालये होती आणि अनेक उत्सवांचे केंद्र होते. या ठिकाणी ब्रिटिश राजवटीची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला आहे जी पूर्वीच्या श्रीमंत संस्थानिक राज्याच्या आठवणींना उजाळा देते.
खासबाग मैदान हे राष्ट्रीय कुस्ती स्टेडियम आहे. हे भारतातील सर्वात मोठे कुस्ती स्टेडियम आहे.हे स्टेडियम राजर्षी शाहू महाराजांच्या काळात बांधण्यात आले होते. हे स्टेडियम कोल्हापूर बस स्टॅन्ड पासून ४ किलो मीटर अंतरावर आहे. ह्या मैदान मध्ये कुस्ती रिंगच्या आसपास सुमारे 30,000 लोकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे ज्याला "हौड" देखील म्हणतात.
हे मंदिर कोल्हापूर बस स्टॅन्ड वरून फक्त ४ किलो मीटर च्या अंतरावर आहे. आणि महालक्षमी मंदिराच्या एकदम जवळ आहे. हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे. श्री बिनखांबी गणेश मंदिर एकाच दगडापासून बनवलेले आहे, जे अविश्वसनीय कारागिरीचे प्रदर्शन करते. ह्या मंदिरामध्ये आपल्याला एक ही खांब आढळून येत नाही. विशेषत: गणेश चतुर्थीच्या वेळी आशीर्वाद घेण्यासाठी येथे भाविकांची खूपच गर्दी असते. ह्या मंदिराला आपण आवश्य भेट देऊ शकता.