महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील सांगली हे एक चैतन्यशील शहर आहे, जे त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा, हिरवळीचे दृश्य आणि ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखले जाते. पारंपारिक भारतीय संस्कृतीचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी येथे विविध आकर्षणे आहेत. सांगलीतील टॉप १० सर्वोत्तम पर्यटन स्थळांसाठी येथे एक तपशीलवार मार्गदर्शक आहे, जी तुमचे प्रवास नियोजन सोपे करण्यासाठी आम्ही तुम्हाला १० पर्यटन स्थळे सांगत आहोत.
गणपती मंदिर सांगली शहरातील गणपती पेठ परिसरात वसलेले एक पवित्र हिंदू मंदिर आहे. हे ठिकाण सांगली बस स्टॅन्ड वरून १.५ किलो मीटर च्या अंतरावर आहे. गणपतीला समर्पित सांगलीचे गणपती मंदिर कृष्णा नदीच्या पूर्वेला वसलेले आहे. या मंदिराच्या बांधकामाला 30 वर्षांचा कालावधी लागला आणि ते १८४५ मध्ये पूर्ण झाले. १९५२ मध्ये गणेश मंदिरासमोर लाल दगडाची कमान उभारण्यात आली. मंदिराचे उर्वरित बांधकाम चिंतामणी राव द्वितीय यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले.
मंदिराचे दरवाजे बहुरंगी नैसर्गिक लाकडापासून कोरलेले आहेत. ह्या मंदिर परिसरात एक मोठा सभामंडप, एक व्यासपीठ आणि एक 'नगरखाना' आहे. मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर, चिंतामणेश्वरी, सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे आहेत. या मंदिरात दरवर्षी भाद्रपद महिन्यात पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. ह्या मंदिराला तुम्ही नक्की भेट देऊ शकता.
कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर येथे आहे परंतु सांगली मध्ये आपण कृष्ण नदी घाट बघू शकता. हे ठिकाण सांगली बस स्टॅन्ड वरून १.५ किलो मीटर च्या अंतरावर आहे. कृष्णा नदीच्या काठावर असलेली सुंदर विस्तीर्ण दगडी रचना मराठा साम्राज्याच्या परशुरामभाऊ पटवर्धन यांनी १७७९ मध्ये बांधली होती असे मानले जाते.नदीच्या मध्यभागी भगवान शिवाचे एक सुंदर मंदिर आहे,घाटावर जाण्यासाठी सुलभ पायऱ्या आहेत. पुलाखालून वाहणाऱ्या नदीचा शांत आवाज, हिरवीगार हिरवळ आणि ताजी हवा यांच्या संयोगाने येथे एक प्रसन्न वातावरण निर्माण होते. शहरी जीवनातील कोलाहल आणि गोंधळापासून दूर राहण्यासाठी आणि परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याशी जोडण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
सांगलीचे संगमेश्वर मंदिर हे या भागातील लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर सांगली जिल्ह्यातील हरिपूर गावात कृष्णा आणि वारणा नदीच्या संगम ठिकाणी आहे. संगमेश्वर मंदिर सांगली बस स्टॅन्ड वरून ३ किलो मीटर च्या अंतरावर आहे. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महीन्या मध्ये येथे खूप गर्दी असते, विशेषत: सोमवारी मोठ्या संख्येने भक्त येतात. संगमेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला विष्णूचे छोटे मंदिर आहे. तुम्ही ह्या मंदिराला नक्की भेट देऊ शकता.
मिरज हे इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध असलेले आकर्षक शहर आहे. शास्त्रीय संगीताशी, विशेषत: हिंदुस्थानी परंपरेशी सखोल संबंध असल्यामुळे याला संगीताच्या वारशासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता, पारंपारिक कलाकृतींसाठी खरेदी करू शकता . येथील लोक खूप छान आणि आदर करणारे आहेत. हे शहर डाळिंब आणि द्राक्षांच्या शेतीसाठी देखील प्रसिद्ध आहे येथे तुम्हाला स्थानिक बाजारपेठांमध्ये ताजी फळे मिळू शकतात. मिरज हे एक अनोखे आणि शांत प्रवास अनुभव घेण्यासाठी एक अद्भुत ठिकाण आहे.
नृसिंहवाडी हे सामान्यत नरसोबावाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखले जाते. हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तहसीलमधील एक लहान शहर आहे. खरतर हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात येते पण हे सांगली च्या खूप जवळ आहे. हे ठिकाण सांगली बस स्टॅन्ड वरून २० किलो मीटर च्या अंतरावर आहे. नरसोबावाडी हे नाव भगवान दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार 'श्री नृसिंह सरस्वती' यांच्या वरून पडले आहे. येथे पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम आहे.
हे ठिकाण बासुंदी आणि कंदी पेढे यासाठी ओळखले जाते. येथे कवठाची बर्फी हाआणखी एक स्थानिक पदार्थ आहे. आंबोली, कट-वडा, मिर्ची भजे आणि उसाचा ताजा रस यांसारखे गरमागरम स्थानिक पदार्थ देणारे अनेक छोटे खाद्यपदार्थांचे स्टॉल मंदिराच्या परिसरात आहेत.
सांगली शहरातील सर्वात जुन्या भागांपैकी एक. सांगलीच्या पटवर्धनांचा तो राजवाडा आहे ते राजे चिंतामणराव पटवर्धन द्वितीय यांनी भारत सरकारला दान केले आहे. हे ठिकाण सांगली बस स्टॅन्ड वरून १ किलो मीटर च्या अंतरावर आहे. राजवाडा हा किल्ला मध्यवर्ती ठिकाणी आहे. किल्ल्याला आत संग्रहालय, मोठा दरबार हॉल, मोठा बुरुज आणि दरबार हॉलच्या समोर तीन कमानी आहेत. येथे जुने गणेश मंदिर सुद्धा आहे.
आयर्विन पूल सांगली बस स्टॅन्ड वरून १.५ किलो मीटर च्या अंतरावर आहे. आयर्विन पूल हा महाराष्ट्राच्या सांगली शहरातील कृष्णा नदीवरील पूल आहे. १९२९ आधी सांगली शहराला पुणे, मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा व्हाया कोल्हापूर असा होता. कारण कृष्णा नदीवर कोणताच पूल नव्हता. सांगलीत इ.स. १९१४ व इ.स. १९१६ साली आलेल्या महापुरानंतर कृष्णा नदीवर पूल असण्याची गरज निर्माण झाली. यासाठी तत्कालीन सांगली संस्थानाचे अधिपती चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन दुसरे यांनी पुढाकार घेतला. पुलाचे उद्घाटन तत्कालीन व्हाईसराय आयर्विन यांच्या हस्ते इ.स. १९२९ साली झाले.
हरिपूर हे सांगलीतील एक छोटेसे सुंदर गाव आहे आणि हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र सुद्धा आहे. हे गाव कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या गावाला धार्मिक, सांस्कृतिक, परंपरा लाभलेली आहे. हरिपूर गावात तुम्हाला संगमेश्वर मंदिर सुद्धा बघण्यास भेटेल. हरिपूर हे ठिकाण सांगली बस स्टॅन्ड वरून ३ किलो मीटर च्या अंतरावर आहे. हे गाव हळद आणि चिंचेच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
SFC मेगा मॉल हा सांगली तील एक शॉपिंग मॉल आहे. हे ठिकाण सांगली बस स्टॅन्ड वरून १.५ किलो मीटर च्या अंतरावर आहे. यात मल्टिप्लेक्स, फिटनेस सेंटर, सलून, कॉफी स्टोर आणि विविध खाद्य पर्याय आहेत. हा मॉल स्वच्छ आहे आणि येथे चांगले वातावरण सुद्धा आहे. येथे तुम्हाला ब्रँड स्टोअर्स, रिटेल स्टोअर्स बघण्यास भेटेल. येथे मनोरंजनासाठी चार स्क्रीन आणि आर्केड गेमसह मल्टीप्लेक्स आहे. SFC मेगा मॉल मध्ये एक मोठे पार्किंग क्षेत्र सुद्धा आहे. सांगलीत मनोरंजन म्हणजे SFC मेगा मॉल.
कृष्ण वारणा संगम हे ठिकाण सांगली बस स्टॅन्ड वरून ३. ५ किलो मीटर अंतरावर आहे. हे संगम तुम्हाला हरिपूर गावात बघण्यास भेटेल. कृष्ण नदीचे उगमस्थान महाबळेश्वर येथे आहे तर वारणा नदी चे उगमस्थान प्रचितगढ येथे आहे. ह्या दोन्ही नद्या चे महाराष्ट्रात खूप मोठे स्थान आहे आणि ह्या नद्यांचा संगम तुम्हाला सांगली मध्ये येथे बघण्यास भेटेल. तर तुम्ही ह्याला नक्की भेट देऊ शकता.