महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यातील शिर्डी हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे जे त्याच्या खोल आध्यात्मिक महत्त्वासाठी आणि पूजनीय संत साई बाबा यांच्याशी असलेल्या संबंधासाठी ओळखले जाते. दरवर्षी जगभरातून लाखो भाविक येथे येतात. शिर्डीमधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम १० ठिकाणांची विस्तृत मार्गदर्शक येथे आहे, जी तुमचे प्रवास नियोजन सोपे करण्यासाठी आम्ही तुम्हाला १० पर्यटन स्थळे सांगत आहोत.
साई बाबा समाधी मंदिर १९१७-१९१८ मध्ये नागपूरचे करोडपती आणि साई बाबांचे निस्सीम भक्त श्रीमंत गोपाळराव बुटी यांनी बांधले होते. हे समाधी मंदिर जगभरातील बाबांच्या भक्तांसाठी खूप आदराचे आहे. हे समाधीस्थळ पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनलेले आहे. समाधीस्थळाभोवती शोभेच्या सजावटीने सजवलेला रेलिंग बांधण्यात आला आहे. साईबाबांची अद्भुत मूर्ती, ज्यामध्ये त्यांना सिंहासनावर बसलेले दाखवले आहे, सभागृहाच्या एका भागात साईबाबांच्या विविध वस्तू ठेवल्या आहेत.
मंदिराच्या पहिल्या मजल्यावर साई बाबांच्या जीवनाचे वर्णन करणारे छायाचित्रे आणि कलाकृतींचा संग्रह आहे. साई बाबा मंदिर सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत उघडे असते आणि साई बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने रांगेत उभे राहून त्यांच्या पाळीची वाट पाहत असतात.
साई बाबा शिर्डीत येण्यापूर्वी, द्वारकामाई ही एक जुनी मशीद होती जी जीर्ण अवस्थेत होती. बाबांनी तिचे द्वारकामाईत रूपांतर केले आणि सिद्ध केले की जगात फक्त एकच देव आहे. द्वारकामाईमध्ये बाबांचे चित्र आणि एक मोठी शिला किंवा दगडी पाटी आहे जिथे बाबा बहुतेकदा बसायचे. या मशिदीचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे बाबा जिवंत असताना सतत धुनी किंवा अग्नी पेटवत असत. साई बाबांच्या भक्ताचे अशे मत आहे कि या धुनीच्या जळलेल्या लाकडाची राख दिव्य आणि पवित्र आहे आणि ती बाबांच्या भक्तांना कोणत्याही आजारावर उपचार करू शकते. बाबा प्रेमाने द्वारकामाईला त्यांची आई म्हणत कारण येथे बसल्यावर त्यांना समाधान आणि आनंद वाटत असे.
द्वारकामाई मशिदीच्या अगदी जवळ असलेले, चावडी हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे, चावडी मध्ये साई बाबा दररोज रात्री झोपत असत. त्यांच्या अनुयायांनी त्यांना द्वारकामाईहून चावडीपर्यंत मिरवणुकीत नेले. चावडी दोन भागात विभागली आहे. एका भागात साईबाबांचा मोठा फोटो, लाकडी पलंग आणि त्यांची एक पांढरी खुर्ची आहे. आजही, दर गुरुवारी, द्वारकामाई ते चावडी अशी मिरवणूक काढली जाते, त्यात बाबांचे पादत्राणे, सत्का आणि जुने फोटो अशा वस्तू एका सुशोभित पालखीमध्ये ठेवल्या जातात. या रंगीत मिरवणुकीला साईबाबांच्या भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.
साई हेरिटेज व्हिलेज हे शिर्डी बस स्टॅन्ड वरून २ किलो मीटर च्या अंतरावर आहे. हे साई बाबांच्या काळात बाबा आणि शिर्डी ग्रामस्थांच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे. बाबांच्या जीवनातील सर्व प्रमुख घटना आणि साई बाबांच्या लीला आणि शिर्डी ग्रामस्थांची जीवनशैली, पुतळ्याच्या स्वरूपात येथे तयार केली आहे. कौटुंबिक मजा आणि विश्रांतीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. साई बाबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे सुंदर वर्णन करणारे विविध पुतळे येथे आहेत. शिर्डी साई बाबांचा पालखी देखावा, आणि बरेच काही देखावे तुम्ही येथे पाहू शकता.
येथे एक सुंदर आणि व्यवस्थित देखभाल केलेली बाग आहे जी मोठ्या क्षेत्राला व्यापते. मुलांसाठी एक छान खेळण्याची जागा देखील आहे. रोप वे आणि टॉय ट्रेन हे मुलांसाठी येथे इतर आकर्षणे आहेत. येथे एक लहान रेस्टॉरंट देखील आहे जे पर्यटकांसाठी काही चविष्ट जेवण पुरवते.
लेंडी बाग हि एकेकाळी एक रिकामी पडीक जमीन होती, परंतु साईबाबांनी ते एका सुंदर बागेत रूपांतरित करण्यासाठी कठोर परिश्रम केले. रोपांना सतत पाणी पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने बागेच्या परिसरात एक विहीरही खोदली. बाबांनी बागेत दोन झाडे - कडुलिंब आणि पिंपळ - लावली. साई बाबांनी प्रज्वलित केलेला सदैव जळणारा एक नंदादीप येथे आहे आणि हा दिवा येथे कायम जळत राहतो. तुम्ही ह्या बागेला नक्की भेट देऊ शकता.
खंडोबा मंदिर हे शिर्डीमधील एक प्रमुख तीर्थस्थळ आहे, जे भगवान शिवाचे एक रूप असलेल्या खंडोबा देवाशी संबंधित आहे. साई बाबा पहिल्यांदाच चांद पाटील यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसह शिर्डीला आले तेव्हा लोकांनी त्यांना पहिल्यांदाच येथे पहिले होते. खंडोबा मंदिराचे महत्त्व दुसऱ्या एका बाबतीतही सुद्धा हे. साईबाबांनी उपासनी महाराजांना त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी चार वर्षे या मंदिरात राहण्यास सांगितले होते.
खंडोबा मंदिर मुख्य रस्त्यावर आहे जे शिर्डी साई बाबा मंदिरा पासून फक्त ४०० मीटर च्या अंतरावर आहे.
साई तीर्थ थीम पार्क, भारतातील पहिले भक्ती थीम पार्क आहे. हे ठिकाण शिर्डी बस स्टॅन्ड वरून फक्त २ किलो मीटर च्या अंतरावर आहे. श्रद्धा, नावीन्य, तंत्रज्ञान आणि मनोरंजनाचे परिपूर्ण मिश्रण तुम्ही तेथे अनुभवू शकता. ह्या थीम पार्क मध्ये तुम्ही द्वारका माई रोबोटिक शो, शिर्डी तीर्थ यात्रा, सबका मालिक एक, लंका दहन, कालिया मर्दन, लेजर शो, मूषक महाराज चा मजा घेऊ शकता. हे ठिकाण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कधी न विसरनारा असू शकतो.
गुरुस्थान, येथे लोकांनी साई बाबाना किशोरावस्थेत पहिल्यांदा पहिले होते, गुरुस्थान हे शिर्डीतील सर्वात महत्वाचे आध्यात्मिक ठिकाण मानले जाते. ह्या ठिकाणी एक कडुलिंबाचे झाड आहे ज्याखाली बाबा ध्यान करत असत. भक्तांचा असा विश्वास आहे की ह्या झाडात अनेक रोगावर उपचार करण्याची शक्ती आहे आणि हे भक्त अनेकदा ह्या झाडाची पाने प्रसाद म्हणून घेतात.
हे मारुती मंदिर शिर्डी साई बाबा मंदिरा पासून फक्त ३०० मीटर वर आहे. मारुती मंदिर ज्याला हनुमान मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे द्वारकामाई आणि चावडी दरम्यान स्थित शिर्डीमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर दक्षिणेकडे तोंड करून आहे आणि येथे शेजारी शेजारी दोन हनुमानाच्या मूर्ती होत्या. साई बाबा चा या मंदिराशी बराच काही संबंध होता, कधीकधी ते ह्या मंदिरासमोर उभे राहायचे आणि थोडा वेळ तिथेच राहायचे.
वेट एन जॉय वॉटरपार्क शिर्डी बस स्टॅन्ड वरून फक्त २ किलो मीटर च्या अंतरावर आहे. वेट एन जॉय वॉटरपार्क मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला मजेदार आणि एकदम फ्रेश वाटेल. येथे सर्व वयोगटांसाठी वॉटर स्लाईड्स, वेव्ह पूल आणि बरेच काही आहे. वेट एन जॉय वॉटरपार्क हे आपल्या कुटुंबासह आनंद घेण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे, येथे तुम्ही किंवा तुमची फॅमिली खूप मजा करू शकता.